Thursday, November 11, 2010

सुखाच्या हिंदोळ्यावर



सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचे,
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाहून निघायचे..
काळजी, द्वेष, सारे फेकून ध्यायचे,
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघून जायचे...

आपले अस्तित्व या दुनियेत पहायचे,
आपले महत्व कुठे आहे का, हे सतत शोधायचे,
आपल्या प्रिय जनाना नेहमीच जपायचे,
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघून जायचे...

आपले सारे कही क्षणात दुसरयाला ध्यायचे,
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचे,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचे,
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघून जायचे...

पण? पण मला अजुन बरेच काही पाहायचेय...
या दुनियेकडून खुप काही शिकायचेय....
इथे, मलाही काही तरी बनायचेय....
म्हणून मला अजुन,..भरपूर जगायचेय,...भरपूर जगायचेय....
आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहायचेय....!!

No comments:

Post a Comment